साप्ताहिक राशीभविष्य 7 ते 13 फेब्रुवारी 2022 : या आठवड्यात तुमचे तारे काय सांगतात, जाणून घ्या 12 राशीचे राशीभविष्य..

राशिभविष्य

नविन वर्षाच्या दुसऱ्याच आठवड्यात ग्रह स्थितीचा सर्व राशीवर वेगवेगळा प्रभाव पाहायला मिळेल, कोणकोणत्या राशीना पहिल्याच आठवड्यात लाभ होईल हे सर्व जाणून घेऊया या आठवड्याच्या राशीभविष्यातून…

फेब्रुवारी २०२२ च्या आठवड्यात सुख वैभव प्रदान करणारा शुक्र ग्रह अस्त होणार आहे. या आठवड्याच्या मध्यात चंद्र आणि गुरु दोघं कुंभ राशीत राहतील. अशात या आठवड्यात गजकेसरी योग तयार होईल जो शुक्रच्या अशुभ प्रभावाला थोडं कमी करेल. ग्रहांचा राजा सूर्य धनू राशीत राहील,बुध आणि शनी मकर राशीत संयोग करतील. या ग्रह स्थितीत नविन वर्षाचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा राहील जाणून घेऊया या आठवड्याच्या राशीभविष्यातून…

​मेष : अस्वस्थता कमी होईल

आठवड्याच्या पूर्वार्धात असणारी मानसिक अस्वस्थता उत्तरार्धात कमी होईल. दोन, तीन, चार जानेवारी हे तीन दिवस विशेष महत्त्वाच्या कामांसाठी प्रयत्नपूर्वक टाळा. पौगंडावस्थेतील मुलांसाठी नाजूक आठवडा. विशेष करून दोन ते चार जानेवारी. कृतिका नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींना हा आठवडा त्रासदायक असेल. त्यांनी विवेक राखावा.

वृषभ : काम पूर्ण होईल

उत्साही वृत्ती राहील. यापूर्वी खूप कष्ट घेतलेले काम पूर्ण होईल. आधी पूर्ण झालेल्या कामाचे श्रेय मिळेल आणि कौतुक होईल. थोडासा अधिक खर्चाकडे कल राहील. कर्ज प्रकरणांमध्ये सावधान असावे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना विरुद्धलिंगी व्यक्तींकडून त्रास होण्याची शक्यता. आर्थिक व्यवहारात सावध असावे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये.

मिथुन : चांगले दिवस

शैक्षणिक दृष्टीने विद्यार्थीवर्गाला खूप लाभदायक दिवस. शिष्यवृत्ती मिळेल. अनाकलनीय विषय ध्यानात येऊ लागतील. संशोधन, न्याय आणि कौटुंबिक सल्लागार या क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगले दिवस. विशेष विषयांचे अध्यापन करणाऱ्या मार्गदर्शकांना त्यांच्या शिष्यवर्गाकडून समाधान मिळेल. कौटुंबिक स्तरावर हा आठवडा मृग नक्षत्राच्या व्यक्तींना चांगला.

कर्क : शुभवार्ता मिळेल

पूर्वार्धात असणारा त्रास, भीती, चिंता, हुरहूर आठवड्याच्या उत्तरार्धात पूर्णतः गेलेली असेल. आध्यात्मिक वृत्तीच्या; विशेषत: पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तरार्धात चांगले दृष्टांत घडतील. पुष्य नक्षत्रातील जातकांना शुभवार्ता मिळेल. शंकाखोर वृत्तीच्या जातकांच्या शंका मिटतील. कौटुंबिक स्तरावर स्थिर काळ. परदेशातून उत्पन्न येणाऱ्या व्यक्तींसाठी चांगली बातमी.

सिंह : चांगला कौटुंबिक काळ

मघा नक्षत्र असणाऱ्या स्त्री-पुरुषांबाबतीत या आठवड्यात उत्तम गर्भाधानयोग आहे. कौटुंबिक स्तरावर चांगला काळ. प्रगतीविषयक निर्णय उत्साहाने घेण्याकडे कल राहील. घाई करू नये. सामोपचाराने निर्णय घ्यावेत. निर्णय दोन पिढ्यांच्या बाबतीतील असेल, तर चर्चेला प्राधान्य द्या.

कन्या : चिंता नको

सुरुवात सर्वसामान्य पद्धतीने होईल; मात्र उत्तरार्ध तितकासा शुभदायी नाही. चिंता करू नये; मात्र सावध असावे. उत्तरा भाद्रपदा आणि हस्त नक्षत्राच्या व्यक्तींवर याचा जास्त प्रभाव असेल. वातविकार असणाऱ्यांना आठवड्याच्या उत्तरार्धात अधिक त्रास होईल. थोडी विश्रांती-आनंदी राहणे-पचनास हलके आणि ताजे अन्न ही त्रिसूत्री उपयोगास येईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची कार्यालयीन जबाबदारी वाढेल.

वृश्चिक : प्रगतीचा आठवडा

पूर्ण आठवडा ग्रहमान चांगले असेल. अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना होणारा शत्रू उपद्रव आपोआप कमी होईल. ज्यांना विशेष यश मिळे, त्यांच्यावर लगेच कामाचा ताणही वाढेल. मन शांत ठेवावे. यशाने हुरळून जाऊ नये. या आठवड्यात पित्तप्रकोप वाढेल, प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. एकंदर आठवडा व्यग्र आणि प्रगतीचा.

मकर : परीक्षेचा काळ

तुमच्याच राशीत बुध-शनी युती, म्हणजे परीक्षा पाहण्याचा खरा काळ! मात्र काळजी करू नये, धोका नाही. सभेत/परिषदेत किंवा चारचौघांत विचार करून बोलावे. उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्राच्या लोकांनी धैर्य राखावे. पूर्ण आठवडा विवेकाने वागावे. वडिलोपार्जित मालमत्तेच्या व्यवहारासाठी हा काळ चांगला नाही. थोडी चालढकल केलेली उत्तम.

टीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI   हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *