मित्रांनो, श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना आहे.
यावर्षी श्रावण महिना आजपासून म्हणजेच 5 ऑगस्ट पासून सुरु होईल आणि 3 सप्टेंबर रोजी संपेल. त्याचबरोबर यावर्षी श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आले होते आणि 2सप्टेंबर या दिवशी श्रावणी महिन्यातील पाचवा सोमवार आहे. या श्रावणी सोमवारी शिवमुठ कोणती वहावी व ते कशाप्रकारे शिव भोजन करावे? याबद्दलची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. यामुळेच या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.
श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. मूठभर तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातूची शिवमूठ एकेक सोमवारी शिवाला वाहतात. श्रावण महिन्यातील शिव पूजन कसे करावे हे आपण जाणून घेऊया. श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर देवघर पूर्णपणे स्वच्छ करुन पूजा करावी. एका थाळीत शंकराची पिंड ठेवावी, त्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा.
त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षता, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करावे, दिवा लावला. पूजा करत असताना “ॐ महाशिवाय सोमाय नम:” किंवा “ॐ नम: शिवाय” या मंत्राचा जप करावा. त्यानंतर शिवलिंगावर त्या त्या दिवसाप्रमाणे मूठ अर्पण करावी. धान्यमूठ शिवलिंगावर उभी धरुन वाहावी, ही शिवामूठ वाहताना पुढील मंत्र म्हणावा-
नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने ।
शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।
मंत्रोच्चार करणे शक्य नसल्यास, शिवा शिवा महादेवा… माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू-सासरा, दिरा- भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, अशी प्रार्थना करावी. शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो.
त्यानंतर शंकराची आरती म्हणावी आणि शंकराकडे सुख-समृद्धीची प्रार्थना करावी. दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा. अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी हे महादेवाची पूजा केली जाते. या पाचव्या सोमवारी शिवू मुठ आहे सातू. सातू हे सात धान्यपासून बनवले जाते. जर तुमच्याकडे सातू उपलब्ध नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सात धान्य एकत्र करून मुठभर इतके धन्य आपण शिव पेंडीवर अर्पण करू शकतो. हे सातू सात धान्यापासून बनवले जाते.
सात धान्याला भाजून या सातूचे पीठ तयार केले जाते. यालाच सातू असे म्हणतात. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे सातू बनवून ते शिवपिंडीवर अर्पण करू शकता आणि अर्पण केल्यानंतर तुम्ही ते प्रसाद म्हणून देखील ग्रहण करू शकता. अशा प्रकारे ही सातूची शिवमुठ शिवपिंडीवर अर्पण केली जाते.
देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो. शक्य असल्यास निराहार उपवास करावा. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी. शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर केवळ शिवशंकरांचा ‘ॐ नमः शिवाय’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो. शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले, तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
अशाप्रकारे पाचव्या सोमवारी शिवपूजा व शिवमुठ अर्पण करावे.