31 मार्च 2022 शुक्र ग्रहाचे गोचर, या राशींना मिळेल नशिबाची साथ

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो,

वैद्यक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीत आपले राशि परिवर्तन करतो आणि त्याचा थेट परिणाम हा मानवी जीवनावर होतो. हा बदल काहींसाठी शुभ असतो तर काहींसाठी अशुभ असतो. संपत्तीचा कारक असलेला शुक्र ग्रह हा 31 मार्चनंतर कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

कुंभ राशी ही शनिदेवांच्या अधिपत्याखाली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि शुक्र यांच्यात मैत्री आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून हे संक्रमण महत्त्वाचा आहे. या बदलांचा सर्व राशींवर परिणाम होईल परंतु 3 राशींना मात्र याचा विशेष लाभ मिळेल. कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया.

1) मेष रास – मेष राशीच्या लोकांना कुंभ राशीत शुक्राच्या संक्रमणाचा फायदा होऊ शकतो. कारण शुक्र तुमच्या अकराव्या भावात संक्रमण करेल. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो.

तसेच मालमत्ता आणि वाहन संबंधित व्यवहारात लाभ होऊ शकतो. त्यासोबतच शुक्र ग्रह तुमच्या दुसऱ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे. या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामातही फायदा होऊ शकेल. तसेच पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते सुद्धा मिळू शकतात.

2) मकर रास – शुक्राचे तुमचं राशीतून दुसऱ्या भावात भ्रमण होत आहे. या स्थानाला दहन कुटुंब आणि वाणीचे स्थान म्हटले जाते. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. करियर आणि व्यवसायात अनपेक्षित यश मिळू शकते. तसेच नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात.

तर ज्या लोकांचे काम मार्केटिंग आणि वकील, शिक्षक या क्षेत्रांशी संबंधित आहे त्यांना या काळात फायदा होऊ शकतो. दुसरीकडे मकर राशीवर शनीदेव राज्य करत असून शुक्र आणि शनी यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी खास ठरू शकते.

3) कुंभ रास – शुक्राचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण शुक्रवार हा तुमचा केंद्राचा आणि त्रिकोणाचा स्वामी आहे. या वेळी तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. तसेच नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते.

या संक्रमण काळात शुक्र कुंभ राशीच्या लग्न भावात विराजमान असेल. या वेळी कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या कामाने खुश होतील. तुमचे आर्थिक बाजूही मजबूत असेल. प्रॉपर्टी डीलर, रिअल इस्टेट एजंट आणि ऑटोमोबाईल या व्यवसायांशी संबंधित असलेल्यांना यावेळी विशेष लाभ मिळू शकतो.

शुक्र ग्रहाचा परिवर्तनाचा या 3 राशींना फायदा होणार आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, शुक्र ग्रहाच्या परिवर्तनाने असा फायदा का होतो आहे? तर याचं कारण असा आहे की, शुक्र ग्रह हा संपत्तीचा कारक ग्रह आहे.

तुमची आर्थिक स्थिती कशी असेल हे शुक्र ग्रह ठरवतो. तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र बलवान असेल तर तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. पण जर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्राची स्थिती चांगली नसेल तर मात्र तुम्हाला आर्थिक चणचण भासू शकते.

आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. म्हणून जर तुम्ही आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रहाची स्थिती एकदा तपासून घ्या त्यासाठी काय उपाय करावे त्यासाठी तज्ञ ज्योतिषांचा सल्लाही तुम्ही घेऊ शकता.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *