वर्ष 2023 कोणत्या राशींसाठी आव्हानात्मक आहे ? तुमची राशी आहे का यात नक्की जाणून घ्या !

राशिभविष्य वास्तूशास्त्र

आता २०२३ हे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अगदी काही दिवस उरले आहे नवं वर्ष सुख समृद्धी घेऊन यावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. मात्र काही राशींच्या व्यक्तींना येणार आहे नवीन वर्ष थोडं कठीण जाण्याची शक्यता आहे. पण घाबरू नका त्यासाठी उपाय सुद्धा आहे. मग काय कठीण जाणार आहे आणि काय आहेत उपाय चला जाणून घेऊया

ज्योतिष शास्त्रानुसार नव्या वर्षात १७ जानेवारी रोजी शनी कुंभ राशीत गोचर करणार आहे. गोचर करण अर्थात राशि परिवर्तन करणे त्याच्या या राशी परिवर्तनाचा परिणाम पाच राशींवर होणार आहेत. त्यातील तीन राशींवर साडेसातीचा परिणाम होईल तर दोन राशीवर शनीची छाया सुरू होईल. शनीचे कुंभ राशी मध्ये परिवर्तन सुरू झाल्यावर मकर राशीच्या लोकांमध्ये साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू होईल.

या परिस्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हा काळ खूप कठीण असू शकतो. काळजी करू नका. उपाय सुद्धा आहेत. जानेवारी महिन्यापासून कुंभ राशीच्या व्यक्तींवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल आणि अशा परिस्थितीत या राशीच्या व्यक्तींना सुद्धा खूप सावध राहावे लागेल.

नोकरदार आणि व्यावसायिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत कुठलाही निर्णय घेताना तो विचारपूर्वक घेतला पाहिजे. ज्योतिष शास्त्रानुसार शनीच्या साडेसातीचे तीन टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यात अडीच वर्षांचा काळ असतो. शनीने रास बदलल्यानंतर मीन राशि राशीवर साडेसाती चा पहिला टप्पा सुरू होईल.

अशा परिस्थितीत मीन राशीच्या व्यक्तींना खूप कष्टाचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर आत्तापासूनच सतर्क होऊन उपाय तुम्ही सुरु केले तर नक्कीच हा काळ तुमच्यासाठी सुकर होऊ शकतो. शनीच्या राशीत बदलामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींवर सुद्धा डिया चालू होईल. नोकरी आणि व्यवसाय बाबत समस्यांचा सामना वृश्चिक राशीच्या व्यक्तींना करावा शकतो. वाद विवाद आणि भांडण यापासून दूर राहा.

शनिदेवांच्या कोपापासून दूर राहण्यासाठी पूजा पाठ करा. शनीनिदेवाच्या परिवर्तनाचा परिणाम होणार आहे. त्यानंतर ची रास आहे कर्क रास कर्क राशीच्या व्यक्तींवर नकारात्मक परिणाम याचा होईल. कर्क राशीच्या व्यक्ती वर शनीची डिया सुरू होईल. अशा परिस्थितीत खूप खबरदारी बाळगली पाहिजे या काळात आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

अशा परिस्थितीत पैशांच्या बाबतीत खबरदारी बाळगा आरोग्याकडे लक्ष द्या. आता तुमच्या लक्षात आले असेल की हे सगळं शनीच्या राशी बदलामुळे होते आणि म्हणूनच आपण उपाय सुद्धा शनी संदर्भातले करायला हवेत आणि म्हणूनच ज्यांना हा काळ कठीण जाणार आहे. त्यांनी हे उपाय करावेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय म्हणजे शनी मंदिरात किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन शनिवारी तेल वाहने.

रुईच्या पानांची माळ वाहून त्याचबरोबर काळ्या रंगाचे उडीद शनिदेवांना अर्पण करा. शनिवारी शनिदेवास काळे उडीद वहावे. दर शनिवारी मारुतीस नारळ फोडावा. हनुमान चाळीसच्या पाठ करावा. यापैकी कुठलाही एक उपाय तुम्हाला नित्यनियमाने करायचा आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या शनिदेव कर्मफल दाता आहेत ते आपल्या कर्माचे फळ आपल्याला देत असतात.

म्हणूनच एखाद्या गरीब माणसाला तळलेले पदार्थ दर शनिवारी खायला द्या. उडदाचा वडा असेल, वडापाव असेल, फरसाण आसेल थोडक्यात काय अन्नदान करा. शनिदेवांना गोरगरिबांची सेवा केलेली आवडते. तुम्ही जेवढा अन्नदान कराल, गोरगरिबांची सेवा कराल तेवढा हा काळ तुमच्यासाठी चांगला जाईल. गरीब निराधार व्यक्तीस एक काळ किंवा निळ्या रंगाचा ब्लॅंकेट दान करा.

त्याचबरोबर या काळात खरं बोला. दुसऱ्याला फसवू नका. दुसऱ्या विषयी वाईट विचार करू नका. या उपायांपैकी कुठलेही उपाय जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करून बघा. नित्यनियमाने करा. नक्की शनिदेवाची कृपा तुमच्यावर होईल.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *