20 रुपयांची नोट गुपचूप ठेवा इथे माता लक्ष्मी होईल प्रसन्न पैशांच्या समस्या दूर होतील.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो,

ओम नमो नारायणा श्री स्वामी समर्थ, मित्रांनो 20 रुपयांची 1 नोट गुपचूप ठेवा इथे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि पैसा येण्याचे अनेक मार्ग खुले होतील. मित्रांनो अनेकजण तक्रार करतात की, त्यांच्याकडे पैसा टिकत नाही.

त्यांच्याकडे पैशांची आवक फार कमी आहे. त्यांच्या घरामध्ये जितका पैसा येतो तितका जास्त पैसा खर्च होतो. निष्फळ गोष्टीवरती पैसा खर्च केला जातो. उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये यश मिळत नाही आहे, घराची बरकत होत नाही आहे. पॉकेट नेहमी रिकामं असत.

पॉकेटमध्ये पैसाच टिकत नाही. मित्रांनो या सर्व गोष्टींवरती हा 1 जबरदस्त अशाप्रकारचा उपाय आहे. भारतीय वास्तू शास्त्र किंवा फिंगशोई असू द्या हा या शास्त्रांमध्ये उपाय वर्णनलेला आहे. मित्रांनो आपल्याला यासाठी लाल रंगाची कोणतीही 1 नोट लागेल.

आपल्या भारतीय चलनामध्ये आपण 20 रुपयांची नोट ही लाल रंगाची म्हणून वापरत असतो. तर मित्रांनो ही लाल रंगाची 20 रुपयांची नोट आपण घ्यायची आहे. लक्षात घ्या हा उपाय करताना जी नोट आपण वापरणार आहोत ही नोट कोणत्याही प्रकारे खराब झालेली नसावी.

त्या नोटेवरती काहीही लिहिलेलं नसावं. अगदी कोरी कडकडीत स्वच्छ अशा आपण 20 रुपयांची लाल रंगाची नोट आपण घ्यायची आहे. आणि मित्रांनो या नोटेच्या बाबतीत ही नोट आपण वर्षभर आपल्या गल्यामध्ये, आपल्या कॅशबॉक्समध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं धन ठेवता,

मौल्यवान वस्तू ठेवता, सोन नाणं ठेवता त्या ठिकाणी ही नोट ठेवायची आहे. मात्र ती ठेवण्यापूर्वी आपण आपल्या देवघरासमोर बसून या नोटेपासून पिरॅमिड तयार करायच आहे. होय मित्रांनो तुम्हाला पिरॅमिडचा इतिहास माहीत असेल,

पिरॅमिडला फिंगशोईमध्ये खूप मोठं महत्व आहे. अस म्हणतात की, पिरॅमिड म्हणजे एक खूप मोठी शक्तीशाली स्थान आहे, एक स्फूर्ती स्थान आहे. अखंड ऊर्जेचा एक स्त्रोत आहे. धन प्राप्तीसाठी, आरोग्य प्राप्तीसाठी पिरॅमिडचा वापर इजिप्तसह,

चीन तसेच भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केला गेलेला आहे. मित्रांनो काळजी करू नका. पिरॅमिड कस बनवायचं, कागदापासून पिरॅमिड कस तयार करतात यासंबंधीचे अनेक विडिओ तुम्हाला युट्यूबवरती अगदी सहज मिळून जातील.

या ठिकाणी आपण तो कसा तयार करायचा आहे शिकवणार नाही आहे. त्यासाठी खूप जास्त वेळ लागू शकतो. आपण युट्यूबवरती फक्त सर्च करा की, पिरॅमिड कस तयार केलं जातं. तुम्हाला अगदी सहज तो विडिओ मिळून जाईल.

How to make piramid म्हटलं तरी ही चालेल. तर मित्रांनो आपल्या देवघरासमोर बसून आपण हे लाल रंगाच्या नोटेच पिरॅमिड तयार करायचं आहे. मित्रांनो ही पिरॅमिड 1 तयार करा, 3 तयार करा, 7 तयार करा, 11 करा तुम्हाला जितकी तयार करता येतील तितकी तयार करा.

1 केलं तरीही चालेल, एकापेक्षा जास्त तयार केलीत, 1, 3, 7, 11, 21, 51, 108 या संख्येमध्ये आपण पिरॅमिड तयार करू शकता. मित्रांनो अशाप्रकारे तयार केलेलं पिरॅमिड हे आपण आपल्या देवघरासमोर ठेऊन माता लक्ष्मीची पूजा करायची आहे.

आणि माता लक्ष्मीस ही विनंती करायची आहे की, आम्ही जे पिरॅमिड तयार केलेलं आहे त्यामुळे आमच्या भरभराटीमध्ये वाढ होऊ दे, आमच्या घरामध्ये समृद्धी येऊ दे, पैसा येण्याचे अनेक मार्ग खुले होऊ दे.

मित्रांनो अस हे पिरॅमिड आपण माता लक्ष्मीच्या पूजेनंतर आणि
याचना केल्यानंतर आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा कॅशबॉक्समध्ये, गल्यामध्ये ठेवायचे आहे. मित्रांनो या ठिकाणी हे पिरॅमिड ठेवल्यानंतर आपल्याला या पिरॅमिडची कोणत्याही प्रकारे पूजा न करता केवळ वर्षभर ते त्याच ठिकाणी ठेवायचं आहे.

1 वर्ष उलटून गेल्यानंतर मित्रांनो आपण हे पिरॅमिड म्हणजेच ही नोट एखाद्या मंदिरामध्ये दान करायचे आहे. हे दानसुद्धा गुपचूप करायचं आहे. आपण जाऊन हे पिरॅमिड दान पेटीमध्ये किंवा एखाद्या देवतेच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि पुन्हा नवीन पिरॅमिड तयार करून आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेऊ शकता.

मित्रांनो या एका वर्षाच्या कालावधीत आपली जी कुलदैवता आहे, आपल जे कुलदैवत आहे या कुलदैवताच दर्शन घेण्यास मात्र सहकुटुंब सहपरिवार आपल्या कुलदैवताच दर्शन घेण्यास मात्र विसरू नका आणि देवभक्ती, देवपूजा या गोष्टी आपण सातत्याने करत चला. आपल्याला नक्की आपल्या धन समस्यातून मार्ग मिळेल. घरामध्ये पैसा टिकू लागेल, घरातील धन समस्या संपुष्टात येतील.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *