१६ एप्रिल, वरूथिनी एकादशीचे महत्त्व, उपासना आणि व्रत

अध्यात्मिक माहिती

येत्या १६ एप्रिल ला आहे वरूथिनी एकादशी. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला वरूथिनी एकादशीच व्रत केलं जाता. शास्त्रानुसार जो कोणी हे व्रत भक्ती भावाने पाळतो आणि विधीनुसार भगवान विष्णूची पूजा करतो त्याला सर्व पापां पासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो असं मानलं जातं. चैत्र कृष्ण एकादशीला वरूथिनी एकादशी म्हटलं जातं.

या दिवशी श्री विष्णुच्या वराह अवताराचे पूजन केले जात. वरूथिनी एकादशी चे व्रत करणाऱ्यांना श्री विष्णूचे संरक्षण कवच मिळते अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया वरूथिनी एकादशीचे महत्त्व, शुभमुहूर्त, शुभयोग आणि सोबतच वरूथिनी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू यांची उपासना कशी करावी.

चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या या वरूथिनी एकादशीला भगवान विष्णूच्या वराह रूपाची पूजा केली जाते. ही पूजा केल्याने सर्व प्रकारचे पाप नष्ट होतात असे मानले जाते. भगवान विष्णूच्या वराह अवताराची पूजा केल्यास सर्व प्रकारचे त्रास आणि दोषही दूर होतात असं म्हणतात. त्यामुळे या दिवशी व्रत आणि पूजेला खूप महत्त्व आहे.

शिवाय वरूथिनी एकादशी हा चैत्र महिन्यातील एक विशेष दिवस आहे. या तिथीला सूर्योदयापूर्वी केलेल्या तीर्थस्थानाने भगवान श्रीहरी विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हणतात. पद्म पुराण, स्कंद पुराण आणि विष्णू धर्मपुराणात या दिवशी अन्न आणि जलदान करण्याचा सुद्धा उल्लेख आहे. असं केल्यास अनेक पटींनी पुण्य प्राप्त होत.

यासोबतच मानव, देवता, पितर यांनाही तृप्ती मिळते असं सांगण्यात येत. पौराणिक कथे नुसार भगवान श्रीकृष्णाला युधिष्ठिराने एकादशी व्रत कथेचे महत्त्व सांगण्यास सांगितलं तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की हे व्रत करणाऱ्याला पुण्य प्राप्त होत. वरूथिनी एकादशीचे महत्त्व म्हणजे या एकादशीला केलेल व्रत मोक्षदायक मानले जात.

यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरूथिनी एकादशीचे व्रत आवश्यक असल्याच श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलं होतं. वरुथिनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी आणि पाप नष्ट करणारी आणि शेवटी मोक्ष प्रदान करणारी आहे. हे व्रत केल्यास सौभाग्य प्राप्ती होते आणि या वरूथिनी एकादशीच्या पराभवामुळे राजा मध्दांता स्वर्गात पोहोचला होता असं सांगितलं जातं.

कुरुक्षेत्र सूर्यग्रहणाच्या वेळी एक मण सोन दान केल्याच जे फळ असत ते फळ वरूथिनी एकादशीचे व्रत केल्याने प्राप्त होतं असं सांगण्यात येत. म्हणून वरूथिनी एकादशीच व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुखभोगून परलोकात स्वर्गाची प्राप्ती करू शकतो असं म्हणतात. या एकादशीच व्रत गंगा स्नानाच्या फळापासून देखील अधिक आहे असं श्रीकृष्णांने युधिष्ठिराला सांगितलं होतं.

यंदा वरूथिनी एकादशी १६ एप्रिलला आहे. वरूथिनी एकादशीचा शुभ मुहूर्त पाहता एकादशीची तिथी 16 एप्रिल ला सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांपासून सुरू होईल ती 17 एप्रिलला म्हणजेच सोमवारी सकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी समाप्त होईल.
एकादशीच्या दिवशीही एक विशेष योग जुळून येतोय. तो योग म्हणजे शुक्ल योग.

16 एप्रिलला दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी शुक्ल योग तयार होईल आणि त्यातही शततारा नक्षत्र दुपारी २ वाजून ६ मिनिटांपर्यंत असेल. वरूथिनी एकादशीच्या पूजेची पद्धत सुद्धा जाणून घेऊया. एकादशीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान करावं. त्या नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णू चे ध्यान करत स्वतःचा संकल्प घ्यावा.

यानंतर एका चौरंगावर पिवळ्या रंगाच कापड पसरवून भगवान श्रीहरी विष्णू सचित्र किंवा मूर्ती ठेवावी. त्यानंतर भगवान विष्णूला पिवळ्या रंगाची फुले आणि हार अर्पण करावा. नंतर पिवळे चंदन लावावे. त्यानंतर तुपाचा दिवा आणि धूप अगरबत्ती दाखवावी आणि त्यानंतर ठेवावा नैवेद्य. यासोबतच एकादशी व्रत कथे सह विष्णुसहस्त्रनामाचे पठण करावं.

शेवटी औपचारिक पद्धतीने आरती करावी. आरती केल्यानंतर दिवसभर असलेला उपवास द्वादशीच्या दिवशी सोडावा. करियर किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करावी आणि ओम नमो भगवते नारायणाय या मंत्राचा 21 वेळा जप करावा. यामुळे सर्व अडथळे दूर होतात अस सांगण्यात येत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *