14 की 15 जानेवारी, कोणत्या दिवशी साजरी करायची मकर संक्रांती?

अध्यात्मिक वायरल

मित्रांनो नवीन वर्षांमध्ये आपण पहिला सण जो साजरा करणार आहे तो म्हणजे मकर संक्रांती. मित्रांनो मकर संक्रांती ही जानेवरी मध्ये साजरी केली जाते. या दिवशी अनेक सुवासिनी स्त्रिया अनेक वस्तूंचे दान करतात. सौभाग्यवती स्त्रीसाठी हा सण खूपच महत्त्वाचा असतो. सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकमेकांसोबत एकोप्याने राहतात.

मित्रांनो जेव्हा सुर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या पर्वाला मकर संक्रांती असे म्हणतात. दरवर्षी मकर संक्राती ही 14 किंवा 15 जानेवारीला साजरी केली जाते. देशाच्या वेगवेगळ्या भागात मकर संक्राती ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते.

काही ठिकाणी मकर संक्राती 14 जानेवारी तर काही ठिकाणी 15 जानेवारीला साजरी केली जाते.महाराष्ट्राच्या अनुषंगाने मकर संक्राती केव्हा साजरी करावी? 14 जानेवारी की 15 जानेवारी कोणत्या दिवशी मकर संक्राती साजरी करावी? हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

तर मित्रांनो हिंदू पंचांगनुसार, 14 जानेवारी शनिवारला सूर्य देव रात्री 8 वाजून 43 मिनिटांवर मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्नान, दान-धर्माचे कार्य वर्जित होतात. यामुळे 14 जानेवारीला मकर संक्रांती साजरी करणे, योग्य नाही. दुसऱ्या दिवशी सुर्य उगवल्यानंतर 15 जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जावी.

मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त15 जानेवारीला मकर संक्रांतीच्या सकाळी 07 वाजून 15 मिनटांपासून ते सायंकाळी 05 वाजून 46 मिनटांपर्यंत मकर संक्रांतीचा शुभकाळ असणार आहे. या शुभकाळात स्नान, दान-धर्म करणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी रविवारी येत असल्याने या सणाचे महत्त्व वाढले आहे.

कारण रविवार हा सूर्य देवाला समर्पित असतो. याशिवाय या दिवशी दुपारी 12 वाजून 09 मिनटांपासून दुपारी 12 वाजून 52 मिनटापर्यंत अभिजीत मुहूर्त असणार. दुपारी 02 वाजून 16 मिनटांपासून 02 वाजून 58 मिनटापर्यंत विजय मुहूर्त असणार आहे. तर मित्रांनो तुम्ही देखील या शुभ मुहूर्तावर मकर संक्रांति साजरी करा आणि याचा आनंद लुटा.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *