नमस्कार मित्रांनो,
मित्रानो महाशिवरात्री आहे महाशिवरात्री म्हणजे महादेवांचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि अत्यंत प्रिय दिवस. या दिवशी आपण भरपूर लोक उपवास करतो, व्रत करतो, काही उपाय करतो. महादेवांच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करतो.
परंतु मित्रांनो जर तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचे व्रत असेल, महादेवांची तुम्ही पूजा करणार असाल तर या 3 वस्तू शिवाय पूजा तुमची पूर्ण होणार नाही. या तीन वस्तू महादेवांच्या अत्यंत प्रिय, महादेवांच्या अत्यंत आवडीच्या वस्तू आहेत.
तर तुम्हीच घरी शिवलिंगाची पूजा करणार असाल किंवा मंदिरात जाऊन महादेवांची पूजा करणार असाल तर या 3 वस्तू शिवाय पूजा करू नका. या तीनही वस्तू तुमच्या पूजेमध्ये वापरा किंवा या तिघांमधून एक तरी वस्तू महादेवाला नक्की अर्पण करा. महादेव प्र स न्न होतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील.
या तीन वस्तू कोणत्या आहेत? तर मित्रांनो यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे पांढरे चंदन. पांढऱ्या रंगाचे चंदन महादेवांना अत्यंत प्रिय आहेत. जर पांढरे चंदन मिळाले नाही तर तुम्ही पांढरे अष्टगंध वापरू शकतात. ही एक गोष्ट तुम्ही पूजेमध्ये नक्की वापरा.
दुसरी वस्तू आहे ती म्हणजे सफेद रंगाचे कोणतीही फुल. महादेवांना पांढऱ्या रंगाचे फूल अत्यंत प्रिय असते. म्हणून एक तरी पांढऱ्या रंगाचे फूल शिवलिंगावरती नक्की महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करावे.
तिसरी सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे महादेवांचे अत्यंत आवडीचे, महादेवांचे अत्यंत प्रिय बेलपत्र. बेलपत्र आपण श्रावण सोमवारच्या दिवशी वापरत असतो. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा शिवलिंगवर 11, 21, 51 आणि 101 असे बेलपत्र आवश्यक ठेवावे.
तर पांढरे चंदन, पांढरी फुले आणि बेलपत्र तुम्ही महादेवांच्या पूजेमध्ये नक्की महादेवांना अर्पण करा महादेव अत्यंत प्रसन्न होतील.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.