नमस्कार मित्रांनो,
1 मार्च मंगळवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे या महाशिवरात्री. या महाशिवरात्रीनिमित्त आपण भगवान शिवशंकराची उपासना नक्की करा. कारण वर्षभरात भगवान शिवशंकराची उपासना करण्याचा सर्वोत्तम दिवस सर्वश्रेष्ठ दिवस म्हणजेच महाशिवरात्री.
या महाशिवरात्रीला 2022 या सालात तब्बल 72 वर्षानंतर पंच ग्राहीयोग बनत आहे आणि म्हणूनच या दिवशी शिवलिंगावर म्हणजेच महादेवांच्या पिंडीवर आपण काही वस्तू नक्की अर्पण करा. या वस्तू महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्याने शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या मनातील इच्छांची पूर्तता नक्की होते.
या वस्तू कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. मित्रांनो महाशिवरात्री म्हणजेच भगवान शिवशंकरांच्या पूजेचा दिवस. या दिवशी आपण शिवलिंगावरती पहिली सर्वात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे भस्म. हे भस्म तुम्हाला पूजेच्या दुकानात नक्की मिळेल. माता पार्वती जेव्हा सती स्वरूपात जाळून भस्म झाल्या तेव्हा भगवान शिवशंकरांनी हेच भस्म स्वतःच्या माथे लावण्याची प्रचलित मान्यता आहे.
सोबतच भगवान शिवशंकर स्मशानात वास्तव्य करतात आणि मनुष्यमात्रास संदेश देतात की, मनुष्य जीवनाचा अंतिम सत्य मृत्यू हेच आहे. प्रत्येक मनुष्याला शेवटी भस्म होयचेच आहे. मित्रांनो भस्म जी व्यक्ती या महाशिवरात्रीस शिवलिंगावर अर्पण करते त्या व्यक्तीच्या मनातील मनोकामनाची इच्छांची पूर्तता भगवान शिवशंभूच्या कृपेने नक्की होते.
दुसरी जी सामग्री आहे ते म्हणजे रुईचं फूल. या रुईचं एखादा तरी फुल आपण भगवान शिवशंकरांना म्हणजेच शिवलिंगावर अर्पण करा. हिंदू धर्मशास्त्रानुसार रुईचे फुल शिवलिंगावर महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण केल्यास 1000 गोदाना इतक पुण्य त्या व्यक्तीच्या माथी जमा होते.
हे फुल अर्पण करताना आपण आपल्या मनातील इच्छा नक्की व्यक्त करा, बोलून दाखवा आणि या इच्छेची पूर्ती करण्याची प्रार्थना महादेवांच्या चरणी करा. मित्रांनो या रुईच्या वृक्षांमध्ये अगदी मुळापासून ते शेंड्यापर्यंत अनेक गुणधर्म आणि गुणकारी तत्व उपलब्ध आहेत.
तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे गो मातेचे दूध. अनेक जण दुधाने शिवलिंगावरती अभिषेक करण्यास प्राधान्य देतात. आपण सुद्धा या महाशिवरात्रीस शिवलिंगाची दुधाने अभिषेक नक्की घाला. या शिवलिंगाचा दुग्ध अभिषेक घाला. अशीही मान्यता आहे की, दुधाने अभिषेक जी व्यक्ती घालते तिच्याही मनातील इच्छांची पूर्तता भगवान शिवशंकर नक्की करतात.
मित्रांनो चौथीची वस्तू आहे ती म्हणजे धोत्र्याच फळ किंवा धोत्र्याच फुल. शक्यतो आपण धोत्र्याच फळ अर्पण करावं. जर ते उपलब्ध नसेल तर आपण धोत्र्याच्या फुलाचा ही वापर करू शकता. मित्रांनो धोत्र्याचे फुल किंवा फळ महाशिवरात्रीस शिवलिंगावर अर्पण केल्याने,
मनुष्य जीवनातील जे काही दुःख आहेत, अडचणी, संकटे आहेत, समस्या आहेत त्यापासून त्या व्यक्तीस मुक्ती मिळते. आपल्या जीवनात ज्या प्रकारची गरज आहे, जी आपली इच्छा आहे, मनोकामना आहे त्याला अनुसरून आपण या आपल्या महाशिवरात्रीस शिवशंकरांना प्र स न्न करून घेऊ शकता.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.