या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त .. पुढील वर्ष विना विग्न पार पडण्यासाठी…

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी

संकष्टी चतुर्थीची प्रत्येक गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतो. संकष्टी चतुर्थीला आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजन करण्याचा दिवस असतो. या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा केल्यास दु:ख दूर होतात, अशी मान्यता आहे. मार्गशीष महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीला म्हणजेच २२ डिसेंबरला संकष्टी चतुर्थी आहे.

या दिवशी चंद्राचं पूजनाला विशेष महत्त्व आहे. मार्गशीष महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्थीला २२ डिसेंबर बुधवारी संध्याकाळी ४ वाजून ५२ मिनिटांनी सुरुवात होईल. तर २३ डिसेंबर गुरुवारी संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी समाप्ती असेल. चंद्रोदय २२ डिसेंबरला असल्याने संकष्टीचा उपवास २२ डिसेंबरला असेल.

संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री ८ वाजून ४८ मिनिटांनी आहे. चंद्र दर्शनानंतर उपवास सोडला जातो. यावेळी चंद्राला जल अर्पण करण्याचा विधी असतो.

पूजेचा विधी

  • सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान आणि धुतलेले कपडे परिधान करा
  • या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं
  • गणपतीची पूजा करताना आपलं मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला हवं
  • गणपतीच्या मूर्तीची चांगल्या प्रकारे फुलांनी सजावट करा
  • पूजेत तीळ, गुळ, लाडू, फुलं, तांब्याच्या कळशात पामी, धूप, चंदन, प्रसादासाठी नारळ आणि केळी
  • पूजा करताना दुर्गा देवीची मूर्तीही जवळ ठेवल्यास शुभ मानलं जातं
  • गणपतीला गंध, फुल आणि जल अर्पण करा
  • संकष्टीला भगवान गणपतीला लाडू आणि मोदकांचा प्रसाद दाखवा
  • संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर गणपतीची पूजा करा आणि संकष्टी व्रत कथा वाचा
  • पूजा झाल्यानंतर आरती करा आणि नंतर प्रसाद वाटा

संकष्टी चतुर्थीला या मंत्रांचा जप करा

  • “ओम एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्”
  • “गजाननम् भूत गणादि सेवितम्, कपित् य जम्भु फलसरा ​​भिक्षितम्, उमसुतम् शोका विनशा करणम्, नमामि विघ्नहेश्वर पद पंकजम्”
  • “वक्रतुण्ड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:, निर्विघ्नम् कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा”

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *