🔷मुलांना वळण कसे लावावे?

Inspirational माहिती

मुले जर आपलं ऐकत नसतील किंवा मुले जास्त चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील आणि त्यांना आपल्याला वळण लावायचं असेल तर मुलांना मारून धोपटून काहीही होत नाही. त्यासाठी काही उपाय आपण पाहूया:

१) मुलांना समजून घेणे:
मुलांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हे पालकांच्या लक्षात आलं पाहिजे. काही पालकांचा रागाचा पारा इतका जास्त असतो की त्यांच्यात जोर जोरात ओरडण्याची आणि भांडण्याची एक सवय निर्माण होते. लहान सहान गोष्टींवर सुद्धा काही आई-वडील इतके अकांड तांडव करतात की कधीकधी आपल्याच मुलावर त्याचा राग काढत असतात. मुले एक सवय म्हणून ही गोष्ट आत्मसात जरी करत नसले तरी त्यामुळे त्यांच्या मनात आपल्या पालकांविषयी चुकीचं मत निर्माण होऊ शकतं. या अशा ओरडण्याने अपमानित भावनेमुळे त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण होऊ शकतं. त्यामुळे अशी सवय असणाऱ्या पालकांनी ही सवय लवकरात लवकर सोडून द्यावी आणि आपल्या मुलांशी खूप प्रेमाने वागावे.

२) बोलून प्रश्न सोडवा:
मुलांशी बोलण्याने अनेक प्रश्न आणि समस्या सहजपणे मिटू शकतात. मुलांनी चूक केली की पालकांना राग येतो आणि ते मारून त्याला समजवायला जातात. पण ही पद्धत अगदी चुकीची आहे. जेव्हा पालक मुलांना ओरडतात किंवा त्यांच्यावर हात उचलतात तेव्हा मुलंही तसंच वागण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मते आपले पालक असे वागतात म्हणजे हा मार्ग योग्य आहे असे त्यांना वाटतं. मुलं हे आपल्या पालकांचे अनुकरण करतात हे तर अनेकदा सिद्ध झालेलच आहे. कधी कधी मुलं या आमानाचा बदला इतरांवर काढतात आणि आपल्यापेक्षा लहान किंवा कमी ताकदवान मुलांना लक्ष करून जे पालक त्यांच्याशी जसे वागले अगदी तसेच ते त्या मुलांशी वागतात. त्यामुळे पालकांनी आपल्या या गोष्टी टाळाव्यात, बदलाव्यात आणि चर्चा करण्यावर भर द्यावा. मुलांशी बोला त्यामुळे अनेक प्रश्न आणि समस्या सहजपणे मिटू शकतात.
तरी बऱ्याच पालकांना विशेषतः आयांना हा प्रश्न नक्कीच पडलेला असेल की खरंच प्रेमाने समजून मुलं सुधारतात का? किंवा ऐकतात का? त्यांना मारल्याशिवाय काहीही फरक पडत नाही, त्यासाठीच पुढील मुद्दा.

३) टाईम आऊट रुल:
म्हणजे काय तर अमेरिकन अकॅडमी ऑफ द पीडियाट्रिक्स यांनी एका संशोधनातून हा खास रूल पुढे आणलेला आहे. यानुसार पालकांनी मुलांना ताकीद द्यावी म्हणजे समजा जर त्याने पहिल्यांदाच चूक केली तर त्याला समजून घ्यावं, दुसऱ्यांदा चूक केली तरीही समजून घ्यावं, पण जर त्याने तिसऱ्यांदा चूक केली तर त्याला सौम्य प्रमाणात का होईना शिक्षा करावी. पण मुल तिसऱ्यांदा चूक करणारच नाही यासाठी त्याला तशी सक्त ताकीत द्यावी. हाच आहे टाईम आउट रुल. हा रुल अनेक मुलांसाठी प्रभावी असल्याचे सिद्ध दिसून आलेलं आहे.

४) आपल्या मुलांना प्रोत्साहन द्या:
ही एक अशी गोष्ट आहे की जी करायला अनेक पालक विसरतात. त्यांच्या मते केवळ मुलांना शिस्त लावणं एवढंच आपलं काम आहे. पण नाही ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे. पालक मुलांनी चूक केली की ओरडतात. पण तेच मुलं जेव्हा ती चूक सुधारते किंवा चांगले वागू लागते तेव्हा मात्र त्यांची स्तुती करत नाही. त्यांना प्रोत्साहन देत नाही. असं करणं अयोग्य ठरतं आणि मुलाची देखील अपेक्षा असते की आपण जी चूक आता करत नाही ती पालकांच्या लक्षात येवो आणि त्याबद्दल त्यांनी आपल्याला शाबासकी देवो. मुलांना जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करतात तेव्हा त्या मुलांना देखील त्या गोष्टी करण्यात अधिक हुरूप येतो आणि त्यामुळेच मुलं अधिक चांगल्या प्रकारे सुधारतात.

५) मुलांना खोट्या धमक्या अजिबातच देऊ नका:
अनेक पालक आपल्या मुलांना खोट्या किंवा पोकळ धमक्या वारंवार देत असतात की जसं की तू असं नाही केलंस तर मी तुला मोबाईल देणार नाही किंवा खेळायला पाठवणार नाही. पण सहाजिकच या धमक्या पोकळ असल्याने ना पालक त्या सिरियसली घेतात आणि ना मुले घेतात आणि कुठेतरी मुलांना त्यांची सवय होऊन जाते. त्यांना वाटू लागतं की आपले पालक फक्त ओरडतात बाकी काहीही करत नाही. त्यामुळे अशी सवय सोडा आणि त्या ऐवजी सामंजसपणाने त्यांना समजावा बऱ्याचदा प्रेमाने समजवलेल्या गोष्टी सुद्धा मुले लगेच ऐकतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *