नमस्कार मंडळी
श्री स्वामी समर्थ
मंडळी आपण स्वामी भक्त तर आहोत पण बऱ्याच भक्तांना स्वामीची पुरेशी माहिती नसते तर खास अश्या लोकांसाठी आज आपण घेऊन आलो आहोत स्वामीबाबतच्या विशेष माहितीचा भाग क्रमांक २
भाग १ जर अजून वाचला नसेल तर आपण याच पेज वर आहे तो वाचू शकता
गोपालकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन. त्यांनी “ह्याची देही ह्याची डोळा” स्वामींना पहिले. त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोजनिशीच्या स्वरुपात लिहून ठेवले आहे. त्यातील वाचलेला एक भाग जश्याचा तसा इथे नमूद करत आहे. “स्वामींना कधी गाढ झोपल्याचे, पाहिलेले आठवत नाही.
फार रात्र झाली की तोंडावरून पांघरूण घेऊन स्वतःला झाकून घेत. मग पांघरुणातून रात्री दीड दोन च्या सुमारास कधी भारुड तर कधी अभंगाचे आवाज येत. बऱ्याचवेळा कुराणातील काही आयतेही आळवत असत. अचानक मोठ्मोठ्यानी वेद म्हणत. कधी कधी कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत. असे रात्रभर चाले. अश्या कित्येक रात्री मी मठात घालवल्या आहेत”
स्वामींना वड, औदुंबर, कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती. एकदा अक्कलकोट गावाच्याबाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते. एक दिवस रस्त्याने जाणारा एक मुसलमान वाटसरू त्याची फांदी तोडायला लागला. त्याने आपल्या कुऱ्हाडीचा पहिला घाव त्या झाडाच्या फांदीवर घालताक्षणीच, इकडे मठात स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले” अरे बघा रे ! कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडी तोडतो आहे” भक्तमंडळीनी मग गावाबाहेर जाऊन त्या मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले.
स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछपी आणी गोट्या खेळत. त्यांना प्राणीही फार प्रिय. नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती. स्वामी तिला प्रेमाने भरवत मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खराखरा चाटे.
स्वामी कधी कधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत आणी तिच्या आचळाना तोंडाने ढुशी देत मग ती सुद्धा आपला पान्हा स्वामींसाठी मोकळा करे. धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गायीला मिठी मारून “माझी माय ग ती “असं म्हणत अन दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत.
याच्या पुढील माहिती लवकरच या पेज वर देण्यात येईल ही माहिती आणि अश्याच स्वामींच्या खास माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपले मराठी न्यूज हे पेज लाईक करा
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.
श्री स्वामी समर्थ महाराजांची अशीच खास माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपले डॅशिंग मराठी हे पेज लाईक करा