सोमवारी शिवमय योगात तुमचा दिवस कसा जाईल नक्की जाणून घ्या.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो,

सोमवार 17 जानेवारी रोजी चंद्र मेष राशीत संचार करेल. राशीच्या दहाव्या स्थानी असलेला चंद्र कर्क राशीसाठी शुभ आहे. कार्यक्षेत्रात दिवस चांगला असेल. आज सोमवार असून शिव योग देखील आहे. अशात शंकराचा अभिषेक करणे शुभ असेल. जाणून घेऊया इतर राशींसाठी कसा असेल दिवस..

1) मेष राशी : आठवड्याचा पहिला दिवस अनुकूल असेल. कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कामाबाबत कौतुक होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंज्यस्य व सुख-समाधानाचे वातावरण असेल. वाहन चालवताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नका. सामाजिक स्तरावर तुम्ही तुमचे म्हणणे स्पष्टपणे मांडाल. आज 80% नशिबाची साथ आहे. ओम अं अंगारकाय नमः या मंत्राचा जप करा.

2) वृषभ राशी : खर्चांमध्ये वाढ होईल परंतु घरातील लोकांच्या सहकार्याने आर्थिक समस्येतून मुक्ती मिळेल. आज वृषभ राशीच्या लोकांनी कर्ज घेऊ नये. विदेशी व्यापारातून फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात मिश्रित परिणाम होईल. आज 75% नशिबाची साथ आहे. सरस्वती देवीची पूजा करा.

3) मिथुन राशी : कौटुंबिक जीवनात अनुकूल बदल दिसून येतील. वडिलोपार्जित व्यवसायातून लाभ होईल. कार्यक्षेत्रातील वातावरण सकारात्मक असल्याने काम करताना मजा येईल. आर्थिक संबंधित समस्या असल्यास आज त्यावर तोडगा निघू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांची त्यांच्या इच्छित स्थळी बदली होऊ शकते. आज 90% नशिबाची साथ आहे. बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा जप करा.

4) कर्क राशी : आज दिवसाच्या सुरुवातीलाच तुम्ही सकारात्मक विचारांनी भारलेले असाल. कार्यक्षेत्रात चांगले काम केल्याने वरिष्ठ अधिकारी खुश होतील. सामाजिक स्तरावर अनावश्यक गोष्टींवर चर्चा करणे टाळा. तब्येत चांगली असावी यासाठी मसालेदार अन्नपदार्थ खाऊ नका. आज 85% नशिबाची साथ आहे. शिवलिंगावर दुध अर्पण करा.

5) सिंह राशी : शिक्षण, मिडिया, न्याय आणि औषध क्षेत्रात काम करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांना आज कार्यक्षेत्रात यश मिळेल. वडिलांशी असलेले संबंध सुधारतील. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. कार्यक्षेत्रात विरोधक देखील तुमची स्तुती करतील. आज लहान भावंडांचे मनोबल वाढवण्यासाठी एखादा सल्ला देऊ शकता. आज 92% नशिबाची साथ आहे. ऊँ घृणि: सूर्याय नमः या मंत्राचा जप करा.

6) कन्या राशी : आळसाला वर्चस्व गाजवू देऊ नका नाहीतर कामे बिघडू शकतात. आईकडच्या लोकांशी आज तुमची भेट होऊ शकते. कामकाजातील राजकारणापासून लांब राहा अन्यथा त्याचा तुमच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होऊ शकतो. सामाजिक स्तरावर तुमच्या बोलण्यातील प्रभावात वाढ होईल. तसेच बोलण्याऐवजी लोकांचे ऐकून घेण्याचा प्रयत्न केल्यास चांगले होईल. आज 75% नशिबाची साथ आहे. गणपतीची उपासना करा.

7) तूळ राशी : आर्थिक गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. संध्याकाळी अनावश्यक खर्चात वाढ होईल. वैवाहिक जीवन अनुकूल असेल. जोडीदार तुमच्या आवडीचे जेवण बनवू शकतो. आई-वडिलांशी संबंधित मनातील चिंता दूर होईल. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ मिळू शकतो. आज 80% नशिबाची साथ आहे. संतोषी देवीची पूजा करा.

8) वृश्चिक राशी : लोकांना स्वतःच्या दृष्टीकोनात बदल करावा लागेल. लोकांमधील नकारात्मक बाजू पाहण्यापेक्षा त्यांच्या चांगल्या बाजूकडे लक्ष दिले पाहिजे. मनाची अस्वस्थता दूर करण्यासाठी ध्यान करणे लाभदायक असेल. आज वडिलांसमोर चांगला वेळ घालवायला मिळेल. तथापि आज ज्यांच्याकडून लाभाची कल्पना देखील केली नव्हती अशा लोकांकडून लाभ होण्याचे संकेत आहेत. आज 76% नशिबाची साथ आहे. हनुमान चालीसाचे पठण करा.

9) धनु राशी : आज लोकं ज्या विषयात कमकुवत आहेत ते विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. एकाग्रतेत वाढ होईल. विवाहित लोकं जोडीदाराच्या इच्छांचा आदर करतील त्यामुळे वैवाहिक जीवनात सकारात्मकता येईल. सामाजिक स्तरावर व्यावहारिक ज्ञानाने तुम्ही लोकांना प्रभावित करू शकता. आज 86% नशिबाची साथ आहे. पिवळे कपडे घालून घराबाहेर जा.

10) मकर राशी : या राशीच्या काही लोकांना आज कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. आज तुमच्यात आशा व उत्साह असेल परिणामी कार्यक्षेत्रात सुखद परिणाम मिळतील. सामाजिक स्तरावर तुम्ही लोकांसमोर तुमचे अनुभव मांडू शकता. कुटुंबामध्ये शांती व प्रेम निर्माण करण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. आज 84% नशिबाची साथ आहे. ऊँ शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा.

11) कुंभ राशी : जीवनात चांगला बदल घडवण्यासाठी नवीन ध्येयाची आखणी करू शकतात. आर्थिक गोष्टी सुधारतील व पैसे साठवून ठेवण्यात यश मिळेल. आज तुमच्या नेतृत्व क्षमतेने वरिष्ठ अधिकारी प्रभावित होतील. कौटुंबिक जीवन सुखद असेल. वडिलांच्या सहाय्याने आयुष्यातील अनेक समस्यांचे निराकरण होईल. आज 86% नशिबाची साथ आहे. रामाची पूजा करा.

12) मीन राशी : एखादा जुन्या मित्राची किंवा दूरच्या नातेवाईकशी भेट होऊ शकते. घरातील लोकांबरोबर धार्मिक ठिकाणी सहलीला जाण्याची योजना तयार होऊ शकते. नोकरी करत असाल तर तुमच्या विवेकबुद्धीचा वापर करून तुम्ही सहकाऱ्यांचे मन जिंकू शकता. सरकारी गोष्टींमुळे अडकलेले काम मार्गी लागू शकते. तब्येतीत देखील चांगले बदल होऊ शकतात. आज 82% नशिबाची साथ आहे. ऊँ बृं बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *