साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ डिसेंबर २०२१ : ग्रहांच्या हालचालीत या राशीची होणार चांदी

राशिभविष्य

नामस्मरण मंडळी

कोणत्या राशीना आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि कोणत्या राशीच्या अपेक्षा पूर्ण होतील हे सर्व माहित करून घेण्यासाठी साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया…

मेष – स्वतःला सिद्ध करा

एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला उत्तम काळ असून, महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. प्रवासाचे योग येतील. आयटीशी संबंधित व्यक्तींना एखादी संधी प्राप्त होईल.

नवा व्यवसाय करण्याचा मानस राहील. नात्याबाबत सुख-समाधान मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. रागावर योग्य नियंत्रण ठेवा. आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल करावा. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. स्वयंसिद्ध होण्याचा प्रयत्न करा. प्रकृती जपा, औषध घेण्याविषयी दक्ष राहा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

वृषभ – संधीचा लाभ घ्या

एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात अनेक संधी प्राप्त होण्याची शक्यता असल्याने त्याचा लाभ घ्या. नोकरदारांना दिलासा मिळेल. व्यवसायात प्रगती कराल. कामानिमित्त प्रवास योग संभवतात. परप्रांतात जाण्याची संधी मिळू शकेल.

आतापर्यंत न मिळालेल्या संधीचा लाभ घेता येईल. करिअरसंबंधी हा काळ लाभदायक राहील. दाम्पत्य जीवन चांगले ठेवा. स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. जोडीदाराला खूश ठेवा. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील.

बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मिथुन – कामात व्यस्त

एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात दैनंदिन कामकाजात व्यस्त राहाल. नोकरदारांना दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला उत्तम काळ असून, महिलांना त्यांच्या कलागुणांना उत्तम प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. चुकीचा निर्णय घेण्याचे टाळल्यास प्रगती करता येईल. काम केल्याचे समाधान मिळेल.

गुरूकृपेचा लाभ घेता येईल. सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करा. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या भवितव्याबाबत. सकारात्मक विचाराने यश मिळविता येईल. प्रकृती जपा, मानसिकता जपा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

कर्क – अपेक्षित गोष्टी साध्य

ग्रहमानाची साथ मिळाल्याने या सप्ताहात आपल्याला अपेक्षित गोष्टी साध्य झाल्याचा आनंद घेता येईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. प्रवासाचे योग येतील. खरेदीचे बेत साध्य होतील. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. नात्यासंबंधी जवळीक ठेवा.

स्थावरबाबतचे प्रश्न सुटू लागतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबियांसमवेत बाहेर जाण्याचा बेत आखाल. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. जोडीदाराची साथ मिळेल.

सिंह – चुका टाळा

एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात कोणत्याही चुका टाळण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. आप्तेष्टांशी सामंजस्याने वागा. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या भवितव्याकडे. कोणालाही जामीन राहू नका.

वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. हितशत्रूंना काबूत ठेवा. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. वाणीवर योग्य नियंत्रण ठेवा. कुटुंबियांसमवेत बाहेर जाण्याचा बेत आखाल. मुलांकडून सुवार्ता समजतील. प्रकृती जपा, खाण्यापिण्य़ाची पथ्ये पाळा. नियमित योगा, सकाळी फिरणे चालू ठेवा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

​कन्या – आव्हानांना सामोरे जा

एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. नोकरदारांना दिलासा मिळेल. कार्यक्षेत्रात श्रमपूर्वक व आत्मविश्वासाने कामे कराल. अपेक्षितांकडून सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग येतील.

नातलगांच्या सुखदुःखाचा विचार करा. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. व्यापारात नव्या विचाराने सुरूवात कराल. प्रवासात सावध राहा. कौटुंबिक वातावरण वादासारख्या प्रसंगांनी बिघडणार नाही याची दक्षता घ्या.

पतीला खूश ठेवा. दाम्पत्य जीवन चांगले ठेवा. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. नियमित व्यायाम करा. जोडीदाराची साथ मिळेल.

तूळ – संमिश्र आठवडा

एकूण ग्रहमान पाहता हा आठवडा संपूर्णपणे संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. नोकरदारांना दिलासा मिळेल. कामाचा उत्साह वाढीला लागेल. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा.

स्थावरबाबतचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवासाचे योग येतील. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. विद्यार्थीवर्गाला त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. आपल्या शांत स्वभावाचा लाभ घेऊ शकाल. निकटवर्ती व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळू शकेल. नातेसंबंध चांगले ठेवा. गैरसमज टाळा. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा.

दाम्पत्य जीवन चांगले ठेवा. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. ताणतणावामुळे प्रकृतीवर परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्या. जोडीदाराची साथ मिळेल.

वृश्चिक – प्रगती कराल

एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात विविध क्षेत्रांत प्रगती करण्याचा आपला मानस राहील. नोकरदारांना दिलासा मिळेल. हितशत्रूंना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यापारात लाभ संभवतो. नात्यामध्ये दुरावा येणार नाही याची काळजी घ्या.

आर्थिक बाजू सावरता येईल. खर्च वाढणार आहे, तेव्हा अनावश्यक खर्च टाळा. प्रवासाचे योग येतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. नोकरीत बदल संभवतो. रागावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रवासात सावधानता बाळगा.

मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. प्रकृतीची काळजी घ्या, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराशी जुळवून घ्या.

धनू – घरगुती प्रश्नांना प्राधान्य

एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात घरगुती प्रश्नांना प्राधान्य देण्याचा आपला मानस राहील. नोकरदारांना दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला उत्तम काळ असून, महिलांना त्यांच्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल.

प्रवासाचे योग येतील. कुटुंबियांसमवेत बाहेर जाण्याचा बेत आखाल. स्थावरबाबतचे प्रश्न सोडविता येतील. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. दाम्पत्य जीवन चांगले ठेवा. खरेदीचे बेत साध्य होतील.

वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. प्रत्येक काम मन लावून कराल. वाहनांपासून सावध राहा. प्रकृती जपा. हवामान बदलल्याने ताप, खोकला यापासून सावध राहा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *