नमस्कार मित्रांनो,
प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या मालकीचे घर असावे असे स्वप्न असते. किमान एक तरी स्वतःचे घर विकत घ्यावे अशी प्रत्येकाची मनोमनी इच्छा असते. मात्र प्रत्येकाचीच ही इच्छा काही पूर्ण होत नाही. घर विकत घेण्यामध्ये किंवा नवीन घर बांधण्यामध्ये किंबहूना नवीन जागा शोधण्यामध्ये अनेकांचा जन्म निघून जातो.
पण घर काही पूर्ण होत नाही. मित्रांनो, तुमच्याही जीवनातही अशा काही समस्या असतील. म्हणजेच पहिली गोष्ट तुम्ही घर बांधण्यासाठी एखादी जागा एखादा प्लॉट शोधताय मात्र ती जागा काही मिळत नाही. योग्य दरात काही मिळत नाही. जमीन घेण्यामध्ये अनेक समस्या येत आहेत किंवा तुम्ही एखादा प्लॉट विकत घेतलाय घराचे बांधकाम थांबले आहे.
घराच्या बांधकामास मुहूर्तच मिळत नाही. थोडक्यात आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपली नवीन वास्तू उभी राहण्यासाठी काही छोटेछोटे उपाय आपल्याला करता येतात. मित्रांनो, चला मग पाहूया ते उपाय. नवीन वास्तूसाठी पहिला उपाय.
रोज श्री गजानन जय गजानन या महामंत्राचा जप करणे. ज्यांना शक्य असेल त्यांनी कमीतकमी दिवसातून 108 वेळा जप करणे. या मंत्राचा जप करण्यासाठी चुकूनही तुळशीची माळ वापरू नका. इतर कोणतीही माळ वापरू शकता. वेळ नसेल तर अगदी चालताबोलता, कुठेही “श्री गजानन जय गजानन” या महामंत्राचा जप करावा.
या मंत्राचा महिमा एवढा मोठा आहे की काही महिन्यातच तुमच्या वास्तूचे प्रारंभ झालेले तुम्हाला दिसून येईल. 2. दुसरा उपाय आहे 21 संकष्टी कराव्यात. चतुर्थीचा उपवास करावा किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी 21 मंगळवार उपवास करा. मंगळवारी फक्त एकभोजन असा उपवास करावा.
हा उपवास गणपतीच्या नावे करायचा आहे. जर 21 मंगळवार हा उपवास करत असाल तर पहिल्या मंगळवारी एक जास्वंदाचे फुल, दुसऱ्या मंगळवारी दोन जास्वंदाची फुले, तिसऱ्या मंगळवारी तीन जास्वंदाची फुले, चौथ्या मंगळवारी चार जास्वंदाची फुले, असे करत करत 21 व्या मंगळवारी 21 जास्वंदाची फुले गणपतीबाप्पाच्या चरणी अर्पण करावीत.
तसेच या जास्वंदी फुलासोबत 21 दूर्वासुद्धा प्रत्येक मंगळवारी गणपतीबाप्पाला वाहायच्या आहेत. सोबतच गणपती अथर्वशीर्षाचा दररोज पाठ करा. असे केल्याने तुमचे घर काही दिवसातच पूर्ण होईल. आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात कराल तुमचे नशीब खूप बलवंत असेल.
आणि गणपती बाप्पाच्या कृपेने काही महिन्यातच जर तुम्हाला तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण झालेले दिसले, तर जो उपाय तुम्ही सुरू केलेला आहे त्यात खंड पाडू नका. तो उपाय तुम्ही संपूर्ण करा. तसेच सातत्याने “श्री गजानन जय गजानन” ह्या मंत्राचा जप करा.
तसेच, महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला घर बांधताना पैशांची अडचण असेल म्हणजे तुम्ही घरकर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल. होमलोनसाठी तुमचे प्रयत्न चालू असतील. मात्र बँक काही होमलोन मंजूर करत नाही.
तर या घराचे कर्ज मिळवण्यासाठी एक उपाय तो म्हणजे एक वाटी मसूर डाळ, आणि त्यामध्ये 100 ते 200 ग्राम गुळ त्या डाळीत टाकायचा आहे. असे हे मिश्रण लाल रंगाच्या गोमातेस खाऊ घालायचे आहे. प्रत्येक मंगळवारी हा उपाय केल्यास, तुम्हाला घराचे कर्ज मिळण्यास योग निर्माण होतात.
अगदी सहज तुम्हाला कर्ज मिळेल. मित्रांनो, तुमचे जेव्हा तुमचे कर्ज कोणतीही बँक मंजूर करेल किंवा कोणतीही संस्था तुम्हाला कर्ज देईल तेव्हा तुम्ही हा उपाय मध्येच थांबवू नका. कारण कोणताही उपाय हा लागलीच थांबण्यासाठी नसतो.
जरी तुमचे कर्ज मंजूर झाले तरी ते टप्प्याटप्प्याने मिळते आणि लगेचच भारावून जावून जो तुम्ही उपाय करत आहात त्यात खंड पाडू नका. लाल रंगाच्या गोमातेस जर लाल रंगाची नसेल तर पांढऱ्या रंगाची गोमाता पहा. जर पांढरीही नसेल तर कोणत्याही रंगाची चालेल.
जास्तीजास्त प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. प्रत्येक मंगळवारी 1 वाटी मसूर आणि 100 ते 200 ग्राम गुळ त्या गोमातेस खाऊ घाला. तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवा. तिच्यासमोर नतमस्तक व्हा. आणि हात जोडून आपल्याला घरासाठी कर्ज मिळावे, पैशांची उपलब्धता व्हावी यासाठी प्रार्थना करा.
सोबतच गोमातेमध्ये 33 कोटी देवांचे स्थान असतात त्यांनासुद्धा आव्हान करा. त्यांनी तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे. यासाठी मदत करावी. अशाप्रकारे त्यांनाही प्रार्थना करावी. तर मित्रांनो, असे काही छोटेछोटे उपाय आहेत ते तुम्ही तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी अवश्य करा.
अश्याच उपयोगी आणि भन्नाट नवनवीन लेख रोज वाचण्यासाठी आताच आपले मराठीन्यूज हे फेसबुक पेज नक्की लाईक करा
धन्यवाद