घराजवळील ही वस्तू वापरा फक्त 2 मिनिटात धान्यातील किडे पळून जातील, पुन्हा धान्यात कीडे कधीच नाही

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

धान्य वर्षभर आपल्याला पुरावे म्हणून आपण धान्य साठवून ठेवत असतो. परंतु याच धान्यामध्ये साधारणत: दहा-बारा प्रकारचे किडे होतात. यामध्ये सोंड, भुंगेरा, खापरखेडा, तांदळातील पतंग असे किडे होतात. हे किडे जास्त पावसाळ्यात पाहायला मिळतात.

पावसाळ्यात असलेले तापमान व आर्द्रता किड्यांना पोषक ठेवते म्हणून पावसाळ्यात जास्त धान्याला जपावे लागते. कीटकांचा जीवनक्रम एक ते पंधरा दिवसांचा असून त्यांची प्रजनन क्षमता भरपूर असल्याने अनुकूल हवामानात त्यांची संख्या एकदम झपाट्याने वाढते.

कृषी तज्ज्ञांच्या मतानुसार धान्याला कीड का लागते? तर किडा-मुंगी, सोंड, भुंगेरा, खापरखेडा, धान्यांचा पतंग यांचा प्रादुर्भाव शेतात धान्य पिकत असतानाच होतो. पिकलेल्या धान्यावर ते अंडी घालतात आणि अशा रीतीने उपद्रव शेतातून साठवणुकीत येतो साठवणुकीची साधन पोते यामध्ये किडे आसरा शोधतात.

सुरुवातीला अगदी कमी किडे असल्या तरी अनुकूल परिस्थितीत त्यांची भरमसाठ वाढ होते. म्हणूनच खबरदारीचे उपाय करण्याची, दक्षता घेणे आवश्‍यक असते. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे धान्य उन्हात चांगले वाळवावे. धान्य भरण्याची जी साधने व जागा नेहमी स्वच्छ ठेवावेत.

जुनी पोती वापरायची झाल्यास शक्य झाल्यास धुरी द्यावी किंवा धुवून वापरावीत. धान्य साठवण्याची जागा स्वच्छ कोरडी असावी.
धान्य पोत्यात साठवताना जमिनीवर फळ्या, बांबू, चटई किंवा पॉलिथिन पेपरचा वापर करावा. त्यामुळे जमिनीतील ओलावा पोत्याला लागणार नाही.

साठवणूक करताना शक्यतो हवामान साधून असावी. अशा या उपायांसाठी मित्रांनो आपल्याला सर्वत्र ही वनस्पती पाहायला मिळते. मित्रांनो हे खोड आहे हे खोड सर्वत्र किराणा स्टोअरमध्ये पाहायला मिळतो. याचं नाव आहे वेखंड. मित्रांनो वेखंड खूप उपयुक्त आहे.

अशा या उपायांसाठी वेखंडच का घ्यायच? तर कारण वेखंडाच्या चूर्णाने वासाने ढेकूण, पिसवा व कीटक तिथे थांबत नाहीत दूर निघून जातात. सुकलेल्या वेखंडाचा खोडा 1.5 ते 3.5% होऊन जाणारी सुगंधी तेल असते. मुळात ग्लुकोज साईड असते ज्यामुळे किडे तिथे थांबत नाहीत.

किडे, पिसवा बंदोबस्त करण्यासाठी वेखंडचा वापर केला जातो. वेखंडाचे तुकडे केल्यानंतर आपल्या घरामध्ये जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने हे वेखंड बारीक कुटून घ्या. बारीक म्हणजे याचे बारीक बारीक तुकडे झाले पाहिजेत.

असे हे बारीक झालेले तुकडे मित्रांनो आपल्या घरामध्ये असलेला लहान कापड घ्या आणि त्या कापडमध्ये टाका. याची पोतली बनवा आणि ही जी पोतली आहे धान्यामध्ये टाका. साधारणतः पोत असेल तर पोत्यामध्ये चार ते पाच गाठी त्याच्यामध्ये टाका.

या गाठीच्या वासाने मित्रांनो त्याठिकाणी कीटक, किडे, सोंड तिथे येत नाहीत आणि आळ्या लवकर होत नाही. या सोबतच आपल्या घरामध्ये जे माचीस असत. आपण माचिस बॉक्स वापरल्यानंतर टाकून देतो ते टाकून न देता साठवून ठेवा.

कारण या माचीसला जी आपण काडी जिथे घासतो त्यावरती जास्त पोटॅशियम असतो. या पोटॅशियमच्या वासाने त्या धान्यामध्ये किडे, आळ्या, सोंड हे त्याठिकाणी येत नाहीत. धान्य सुरक्षित राहतं. असा हा उपाय तुम्ही करा.

अश्याच उपयोगी आणि भन्नाट नवनवीन लेख रोज वाचण्यासाठी आताच आपले मराठीन्यूज हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *