आई- पिंकी बाबू कसा आहे? भन्नाट जोक्स..

जोक्स

नमस्कार मंडळी

आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे धमाकेदार विनोद नक्की आवडतच असणार… एक लक्ष्यात ठेवा विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा पदार्थ मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… म्हणून विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो…

को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल…

हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका-टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयु ष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-

विनोद 1- अत्रे नेहमी रात्रीच्या जेवणानंतर पान खाण्यासाठी पान पट्टीवर जात असतात.. पान पट्टीवाला अत्रेंचे वाढलेले पोट बघून विचारतो- “काय अत्रे, कोणता महिना चालू आहे?”
अत्रे हजर जबाबी- “पहिला महीना चालू आहे..” पानपट्टीवाल्याला लय भारी वाटतं. दुस-या दिवशी परत तोच प्रश्न.. अत्रे- “दुसरा महीना , परत —3 , परत— 4, 5, 6, 7, 8, 9, असे दहा महिने होतात..
अकराव्या दिवशी पानपट्टीवाला म्हणतो- “अत्रे साहेब, दहा महिने झाले तरी अजून खुशखबर कशी काय नाही? तुम्हाला नक्की काय होणार आहे..??”
अत्रे- मित्रा, मला हत्तीचं पिल्लू होणार आहे..” पानपट्टीवाला- “कसं शक्य आहे?” अत्रे— “पटत नसेल तर माझ्या पोटाखाली हात लावून बघ, ‘सोंड’ बाहेर आली आहे..”

विनोद 2- एक जोडपे गाडीतून जात असते….. टायर पंक्चर होतो….. दोघे खाली उतरतात….. नवरा कामाला लागतो…… बायकोच्या सूचना सुरू : अहो दगड लावलात का ? जॅक आहे ना ?…
हळू जरा… पटापट करा… लग्नाचा मुहूर्त टळेल !! नक्की जमतय का ?? हल्ली सवय मोडली आहे ना…! बाजूने मोटारसायकलस्वार जात असतो…
तो थांबून विचारतो.. काही मदत पाहिजे का ?? नवरा : जरा माझ्या बायकोशी गप्पा मारत बसा…. मी टायर बदलतो !!!

विनोद 3- तुम्ही जेव्हा अप रात्री घरी येतात आणि तुमची पत्नी तुम्हाला मिठीत घेते आणि छान पप्पी घेते. तेव्हा त्याला फक्त प्रेम समजू नका…..
ते फक्त आकर्षण नसते तर ती… एक तपासणी असते…… दारुची, सिगारेटची, लिपस्टिकची, परफ्युमची, आणि दुसर्या स्रीच्या लांबट केसाची…..
लक्षात ठेवा पुढच्या वेळी घरी जातांना सर्व पुरावे नष्ट करूनच घरी जा…. सर्व लग्नझालेल्या सर्वाच्या जनहितार्थ जारी……

विनोद 4- मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो, ‘विरुद्धार्थी शब्द लिहा’ आणि शब्द असतो ‘सात्विक’ . बंडू खूप विचार करतो आणि उत्तर लिहितो ‘सात स्ट्रॉंग’ परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. बंडू
चंदूला विचारतो, ‘चंदू सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय लिहिलास रे?’ चंदू उत्तर देतो, ‘सात खरेदी कर.’ बंडू म्हणतो, ‘आयला होय रे, माझ्या लक्षातच आले नाही. तरीच मी विचार करत
होतो मराठीच्या पेपरमध्ये इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा काय विचारला.’

विनोद 5- एक तरुणी तिच्या बाळाच्या शीचं सॅम्पल घेऊन पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासण्यासाठी गेली होती. ते तपासता-तपासता टेक्निशिअन हैराण झाला. शेवटी तो बाहेर येऊन त्या तरुणीला म्हणाला, ‘अहो मॅडम, ही शी नाहीय. हा तर शुद्ध तुपातला शिरा आहे.’ तरुणी: अय्या, हो का? मला जरा लगेच तुमचा मोबाइल देता का प्लीज? माझा फोन बंद आहे.
टेक्निशिअन: का हो? काय झालं? तरुणी: अहो, जरा मिस्टरांना फोन करून सांगते, की त्यांनी चुकीचा डबा नेलाय म्हणून….

अशाच माहितीपुर्ण पोस्ट आणि भन्नाट जोक्स रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *